Thursday, 2 April 2020

चित्र तुझ...!!!

डोळे तुझे स्वच्छ
जणू निरभ्र आकाश
तुझ्या नजरेचा तो कटाक्ष
जणू सूर्याचा प्रकाश

हसणं तुझ निर्मळ
जणू खळखळणारा झराच
तुझ्या केसांची ती हालचाल 
जणू चित्रकार खराच

सुंदर तुझी मांडणी
जणू स्वर्ग अवतरला 
ध्यास असे हा तुझा
जणू मनी वसलेला
- वरद

Thursday, 2 January 2020

बावरे मन....!

तू नसताना तुझ्या असण्याचे
आभास शोधत बसते....
तू नसताना तुझ्या हसण्याचे
सुमधुर गीत आठवते....
तू नसताना तुझ्या नयनांचे
भाव मनी सजवते....
तू नसताना तुझ्या नसण्याचे
कारण शोधत असते....
- वरद

Sunday, 22 December 2019

शोधात तुझ्या...!

तप्त त्या उन्हात मी
सावलीच्या शोधत तुझ्या

तहानेने व्याकुळ मी
झऱ्याच्या शोधात तुझ्या

घामाने चिंब मी
झुळुकेच्या शोधात तुझ्या

मनाने तुझाच मी
सोबतीच्या शोधात तुझ्या

- वरद

Thursday, 29 August 2019

मिसळ लस्सी चहा आणि क्रिमरोल

खायला होतं खूप काही
पण सोबत मात्र तू नव्हती
म्हणूनच की काय आज
मिसळ खूपच तिखट होती

पाहिली होती गोड स्वप्न
ती फुलण्या आधी नासली होती
म्हणूनच की काय आज
लस्सी मात्र आंबट होती

बुडालो होतो प्रेमात तुझ्या इतका
म्हणूनच की काय आज
चहात बुडवलेल्या क्रिमरोलला
तुझ्या सारखी चवच नव्हती

गेले कित्येक दिवस मी हे खाल्ल
पण आज मला समजलं होतं
मिसळ लस्सी चहा आणि क्रिमरोल
तुझ्याविना  मात्र अळणीच होतं
                       
- वरद

Friday, 23 August 2019

ती ..!!

जाता जाता ती
गोड हसून गेली
दगडाच्या ह्या हृदयाची
तार छेडून गेली

जाता जाता ती
गोड हसून गेली
अंधारलेल्या रात्रितही
तारे चमकाऊन गेली

जाता जाता ती
गोड हसून गेली
काही क्षणांसाठी
वेडं करून गेली

- वरद

Monday, 12 March 2018

एक थेंब अश्रूंचा

एक थेंब अश्रूंचा
खूप काही सांगून गेला
जणू दू:खातल्या भावनांचा
पाढाच वाचून गेला

गालावरती जाता जाता
ओघळ सोडून गेला
जणू आठवणींच्या वाळवंटात
ठसेच उमटवून गेला

तो एकच थेंब असा
मनाची दुर्दशा सांगून गेला
जाता जाता तो
मन कठोर बनवून गेला
मन कठोर बनवून गेला

                 -  वरद




Friday, 9 February 2018

नजर...!!!

नजरेत तुझ्या त्या भावनांचे
गीत हे असे ओसंडले
अबोल माझ्या ह्या शब्दांचे
सूर नयनी जसे जडले

सुंदर एका कटाक्षाने
हृदय चिंब झाले
चक्षुंच्या ह्या संवादाने
शब्दांचे हे गीत बनले

नाते असे हे नयनांचे
अव्यक्त अशा त्या शब्दांचे
नजरेच्या त्या लेखणीने
भाव विश्व चितारण्याचे

              - वरद