Thursday, 14 April 2016

कुणासाठी...कशासाठी....??

                                                       
कुणाच्याही इतक जवळ जाऊ नये की
आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रदय कधी
तर असह्य यातना व्हावी

कुणालाही इतका वेळ देऊ नये की
आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
अन् एक दिवस आरशासमोर
आपणास आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीपण ओढ नसावी
की पदोपदी त्याची वाट बघावी
अन् त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

पण तरीही मन म्हणते नाती अशी जपावी की
त्यात मनाची मनाशी जोड असावी
निभवावे असे की त्याला 
कशाचीच तोड नसावी

थोड थांबून तरी बघाव
त्या नात्यातल्या गोडव्यासाठी
थोड मागे वळुन तरी बघावं
राहीलेल्या पाऊल खुणांसाठी
                              - वरद

3 comments: