Thursday, 14 April 2016

नात्यासाठी....

दुनियादारीही करून बघीतली
स्वतःशी दुश्मनी करून झाली
खुप चूकाही करून झाल्या
पण पण नाती तर होतीच
ती स्वभावानूसार टिकवण जरा अवघडच
कधी कुणाला काहीतरी बोलाव
चुकीच आहे समजून नंतर माफी मागावी
पण त्याने कधीच माफ न कराव
पण जेव्हा जगण्याची आशाच संपते
तिथेच संपते की काय अस वाटत
अवस्था नटसम्राटासारखी झाली आहे
त्याला स्वतःच्या मुलांनी पण समजुन घेतल नाही
कुणी घर देता का घर ?
त्याच धरतीवर उभा आहे मी
पण घरासाठी नाही माफीसाठी....नात्यासाठी
नात्यांच्या या गुंत्यात मन वेडे झुरते
कधीकाळी दिवसभरूनी दिवसाकाठी मरते
क्वचित कधी किरणाची खोटी आस दाखवते
घडलेल्या चुकीच्या माफीसाठी थकून भागुन झिजते

                               -  वरद

No comments:

Post a Comment