Thursday, 14 April 2016

कधी कधी....!!!

कधी कधी वेडे मन का हरवते ,
कधी कधी एकटे एकटे झुरते ;
कधी कधी वाट हळवी चालताना,
का अशी पून्हा संपते ...कधी कधी ...

कधी कधी भावनेच्या सागरात बुडते,
कधी कधी शब्दाच्या लहरीत तरंगते ;
कधी कधी काव्यातील अबोल भाव,
न बोलता सारे जाणून घेते... कधी कधी...

कधी कधी रेशमी स्वप्न फुलते,
कधी कधी आठवणीत रमते ;
कधी कधी नकळत का पून्हा असे,
आपल्या माणसांना बिलगते... कधी कधी...

कधी कधी मन एकातात झूरते,
कधी कधी सावलीस बिलगते ;
कधी कधी स्वपनाळू सारखे का असे,
पून्हा  स्वपनातच रमते....कधी कधी...!!

                                 -वरद

No comments:

Post a Comment