Thursday, 14 April 2016

ती माझी मैत्रीण असते

जी नेहमी हसत असते,
जी कधी कधी चिडते;
 आणि लगेच शांत होते,
सर्वांना तिची मैत्री हवी-हवीशी वाटते,
.......ती...ती माझी मैत्रीण असते....!

तिना..! हसतांना खूप सुंदर दिसते,
रडतांना मात्र लहान मुलगीच असते,
पण ती हसली कि माझ्या आनंदाला सीमा नसते,
असं आमचं दोघांच “विश्वासाच” नात
......ती...ती माझी मैत्रीण असते .........!

सर्वांचा विचार करणारी,
स्वत:च दु:ख लपवणारी,
मनाच्या गाभाऱ्यात एकटीच दु:ख सोसणारी,
इतरांच्या आनंदात आनंद मानणारी
.....अशी.....ती...ती माझी मैत्रीण असते ........!

तिला ना....!  जास्त काही हव नसत,
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधते,
आणि सर्वांना आनंदी करते
..........ती....ती माझी मैत्रीण असते .......!

कधी-कधी खोट-खोट हसते,
पण तिथेच ती फसते,
कारण तिच्या Smile सारखी Smile 
या जगात कुणाकडेच नाही
...ती...ती माझी मैत्रीण असते .........! 

तिचे तीन भावंड तिच्या सोबतच असतात,
“जाऊद्या, सोडा, असचं” हि त्यांची नावं
.....मला ते फसवतात....., 
पण त्यात ती स्वतःच फसते
...कारण...ती ..ती माझी मैत्रीण असते ...!

तिला माऊ हवी म्हणून
ती नेहेमीच हट्ट करते
कुठेही माऊ दिसली की
ही तिला जवळ करते
माऊला बघून तिची कळी
नेहेमीच खूल्लेली असते...ती..ती माझी मैत्रीण असते .....!

तीना मनातून खूप हळवी असते
पण वेळ प्रसंगी कठोरही बनते
अत्यंत कठीण परिस्थितीत
सहनशिलता हिची परिक्षा घेते
पण त्यातूनही मार्ग काढते
.......ती..ती माझी मैत्रीण असते .....!

सगळ सगळ मला सांगते
माझी खूप सारी काळजी करते
ती स्वतः हसताना मलाही हसवते
असं फक्त एकच व्यक्ती करते
ती ....ती माझी मैत्रीण असते ......!
                           -वरद

No comments:

Post a Comment