Thursday, 14 April 2016

मैत्री ही अशी ....

सोबत नसताना पण
होतो भास
आठवतात शब्द
आहेच मी पास

वाटते मैत्रीण
माझी असावी
नेहमी माझ्या
जवळ असावी

येतो स्वार्थी विचार
मनात माझ्या

अशी मैत्रीण फक्त
माझीच असावी
अशी मैत्रीण तर
कोणालाही न मिळावी
वाटतय तिला सगळ्यां पासून
लपवून ठेवावी

हे वेडं मन सारखा
असाच विचार करतं
म्हणुन बय्राच वेळा
नाराज ही होता

कारण
त्याला माहीती असतं

हा स्वार्थी विचार फक्त
विचारच राहणार
वेडं मन मात्र त्यासाठी
नेहेमीच झुलत राहणार

                      -वरद

No comments:

Post a Comment