Thursday, 14 April 2016

शब्दांनी असं का केलं ?

खुप काही बोलायचं होतं
पण शब्दच सुचले नाहीत
शब्द ओठात लपले
त्याना पायच फुटले नाहीत

फक्त डोळ्यातूनच बोललो
शब्द आतच राहीले
मग विचार माझे गेले
त्यांनाच शोधत राहीले

शब्द होते फिरत
वाटली नाही त्याना
बाहेर येण्याची गरज
ते तर होते मस्त फिरत

शब्दांच्या या दुनीयेत
मन माझे गेले
सगळ्या शब्दांच्या
पाया  पडले

तेव्हा शब्द ओठांवरती आले
छान छान बोलु लागले
पण मला प्रश्न पडला की
शब्दांनी असं का केलं?
शब्दांनी असं का केलं?
 
               -  वरद

No comments:

Post a Comment