Thursday, 14 April 2016

तुच असतोस मित्रा..!

मित्र कोण असतो ?
मित्र कसा असतो ?
प्रत्येक क्षणाला मदत करणारा,
प्रत्येक पावलाला साथ देणारा,
तुच खरा मित्र असतो...!

तेच नाते बनते प्रेमाचे,
तेच नाते बनते विश्वासाचे,
हसणं-रडणं असतं त्यात,
तुच आपुलकीचा दिलासा देतो,
तुच खरा मित्र असतो....!

हे नाते बनते आपोआप,
त्याला न लागे कुणाचा आधार,
आपल्या मनामध्ये सतत ठसतो,
तुच खरा मित्र असतो....!

पाहिलेलं कधी खरं नसतं,
खरंदेखील कधी खोटं असतं,
रोज हसत जा माझ्यासाठी,
तुझविना मैत्री नाही कुणाशी,
याची जाणीव करून देतो,
तुच खरा मित्र असतो..!

काहीच नाही माझ्याशी लपून ठेवी,
सत्य काय आहे ? मला सांगतो,
मनातील सगळ्या भावना व्यक्त करतो,
तुच खरा मित्र असतो....!

                          -वरद

No comments:

Post a Comment