छान होते बालपण
बाबा,तुमच्या कुशीतलं
मऊ मऊ भात आणि
परीच्या गोष्टीतलं
खोडकरपणा केल्यावर
ओरडायचात तुम्ही
रुसून मग झोपल्यावर
कुशीत घ्यायचात तुम्ही
दिवसभर काम करुन
बाबा,थकून जायचात तुम्ही
थकलेल्या हातांनी मग
झुला द्यायचात तुम्ही
माझ्यासाठी बाबा
लहानगे व्हायचात तुम्ही
उगाच रुसायचात अन्
उगाच भांडायचात तुम्ही
माझ्यासाठी बाबा
मित्र बनता माझे तुम्ही
कष्टकय्रा हातांनी तुमच्या
इच्छा पुर्ण करता माझ्या तुम्ही
होतो थोडा गर्व मनात
असे बाबा कोणाचेच नसो
मागणे हेच देवाकडे
जन्मोंजन्म तुमच्याच कुशीतला असो
- वरद
Khup chan Varad...👍
ReplyDeletethanks vrushali:-)
Delete