Thursday, 14 April 2016

आयुष्य आपलं.....!!

खरच...किती बरं झाल असत,
जर...आयुष्य आपल वाटता आल असत....आपल्यातल आयुष्य थोड,
दुसरय्रा कुणाला देता आल असत.....

आईने आपलं आयुष्यच
मुलाला दिललं असतं....
खरच...किती बरं झाल असत,
जर...आयुष्य आपल वाटता आलं असत

एक प्राणी दुसय्राला खातो
त्याच आयुष्यच दुसय्राला देतो....
आपल्या माणसांसाठी कष्ट घेऊन
आपण आपलं आयुष्य त्यांना देतो....

पण...किती बरं झाल असत,
जर...आयुष्य आपल वाटता आलं असत....

एखाद्याची यातना स्वतः
अनुभवली असती....
तर काही दिवस आपली
रोजच दिवाळी असती....

तेव्हा कुठे सगळ्यांना
इतरांची जाणीव झाली असती....
आपल्यांचे कष्ट तरी कमी करावे
अशी बुद्धी त्यांना झाली असती....

तेव्हा कुठे आपली माणसं
सुखी झाली असती....
आपलं आयुष्य आपल्यांसाठी दिलं
म्हणुन समाधानी झाली असती....

म्हणुनच मग...
आपल्यांसाठी आपलं आयुष्य
वाटून बघा.....
मला होतो तसा.....!!
आयुष्य वाटण्यातला आनंद
चाखून बघा.....

                    - वरद

2 comments: