Thursday, 14 April 2016

आपली मैत्री

मैत्री आपली अशी लोणच्यासारखी
मुरत जाते जुनी होइल तशी

मैत्री आपली अशी फोडणीसारखी
लज्जत येते जीवनाला कशी

मैत्री आपली अशी मीठासारखी
चव नसेल तर जीवन अळणी

आहा तुम्ही सावरायला
म्हणून पडायला आवडते

आहात तुम्ही हसवायला
म्हणून रडायला आवडते

आहात तुम्ही समजवायला
म्हणून चूकायला आवडते

आहात तुम्ही आयुष्यात
म्हणून जगायला आवडते

                    -वरद

No comments:

Post a Comment