Thursday, 14 April 2016

तुमच्यामुळे....

तुझ्या  हळूच हसण्यात साऱ्या
प्रश्नांची उत्तरे माझ्या
जरी झाले ओठ मुके तरी
डोळ्यात आठवणी ताज्या

बहाणे सारे तुझे
अलगद छळणारे
माझ्या या वेड्या
मनाला भूलवणारे

ताकत आहे शब्दात
एवढी तूझ्या
मग हरवतात कसे हे शब्द
बोलताना माझ्या

नजरेतील भाव तुझ्या
मलाच माझ विसरणारे
भूल पडे नजरेला माझ्या 
नकळत त्यात मला गुंतविणारे!

                       -वरद

No comments:

Post a Comment