Thursday, 14 April 2016

कुणासाठी कसं जगायच... ?

जीवन असच जगायच असतं...
रडता रडता हसायच असतं...

दुःखं तर येतच असतात
आपण फक्त हसायचं असतं...
हसता हसता जगायच असतं
रडता रडता हसायचं असतं...

हसत हसत संकटाला सामोरं जायच असत
काट्यातून गुलाब फुलवायच असतं...
प्रश्न असतो एकच,
कुणी कुणासाठी जगायच असतं ?...

आईने मुलासाठी तर गाईने वासरासाठी
जगायच असतं...
तुमच्या आमच्या नात्यासाठी
जगायच असतं...

कमळासारखं चिखलातही आवडावं
असं जगायच असतं...
स्वतःचं मन सुंदर करताना
स्वतःसाठी जगायच असतं...

मनातील वादळांशी झगडत
जगायच असतं...
मोहाचे काटे विसरुन आपल्या
स्वप्नापर्यंत जायचं असतं...

स्वतःचं मन सुंदर करताना
दुसय्राचही मन जिंकायचं असतं...
माणसाने माणसासाठीच
जगायच असतं...

जगता जगता दुसय्राच्या ह्रदयात आपलं
स्थान निर्माण करायचं असतं...
आपल्या आणि फक्त आपल्या
माणसांसाठीच जगायचं असतं...

जीवन असच जगायच असतं...
रडता रडता हसायच असतं...
हसता हसता जगायच असतं...
        
                                - वरद

No comments:

Post a Comment