Friday, 6 May 2016

तुटलेला मी एकटाच या दुनियेशी

मी कोणी शत्रू नाही
मी कोणाचा मित्र नाही
मी फक्त माझा आहे
कोणी घातलेली भिक नाही
कि भिकाऱ्याचा माझा जन्म नाही

खात्या पित्या घरचा
कुलादिपकाचा जन्म पाही
ना आहे भीती कुणाशी
ना आहे राग कुणाशी
तुटलेला मी एकटाच या दुनियेशी

दुनिया आहेच ही गोल
त्यात मी पुन्हा तळाशी
मोठी मोठी स्वप्न पाही
ना स्पर्धा कुणाशी
 तुटलेला मी एकटाच या दुनियेशी

संकटे येती मोठी मोठी
हिम्मत माझ्या पाठीशी
दोन हात एकेकाशी
तुटलेला मी एकटाच या दुनियेशी


                                  -  वरद 

2 comments: