काही कमावण्या पेक्षा
काही गमावण्याची ,
तर काही तुटण्याची
मजा वेगळीच असते
वाट्याला आलेल्या सुखा पेक्षा
जीवनातील दुःखाची
त्यातून होणाऱ्या वेदनांची
मजा वेगळीच असते
आपलं आपलं म्हणता म्हणता
दुरावत जाणाऱ्या नात्यांची
तुटणाऱ्या भावनांची
मजा वेगळीच असते
साफ रस्त्याने चालताना
अचानक घुसलेल्या काट्याने
बसलेल्या धक्क्याची
मजा वेगळीच असते
बाहेर पाऊस पडत नसताना
डोळ्यातून पडलेल्या सरींची
त्यात भिजलेल्या हृदयाची
मजा वेगळीच असते
रात्रीच्या स्वप्नात विहारताना
आठवणीनच्या सागरात
बुडालेल्या क्षणांत डुंबण्याची
मजा वेगळीच असते
दुरावलेल्या अंतराची साथ
एकटेपणाला मिळते
त्याच्या सोबतच्या क्षणांची
मजा वेगळीच असते
जीवन जगण्या पेक्षा
घडलेल्या चुकांची
त्या अनुभवांची चव चाखण्याची
मजा वेगळीच असते
- वरद
काही गमावण्याची ,
तर काही तुटण्याची
मजा वेगळीच असते
वाट्याला आलेल्या सुखा पेक्षा
जीवनातील दुःखाची
त्यातून होणाऱ्या वेदनांची
मजा वेगळीच असते
आपलं आपलं म्हणता म्हणता
दुरावत जाणाऱ्या नात्यांची
तुटणाऱ्या भावनांची
मजा वेगळीच असते
साफ रस्त्याने चालताना
अचानक घुसलेल्या काट्याने
बसलेल्या धक्क्याची
मजा वेगळीच असते
बाहेर पाऊस पडत नसताना
डोळ्यातून पडलेल्या सरींची
त्यात भिजलेल्या हृदयाची
मजा वेगळीच असते
रात्रीच्या स्वप्नात विहारताना
आठवणीनच्या सागरात
बुडालेल्या क्षणांत डुंबण्याची
मजा वेगळीच असते
दुरावलेल्या अंतराची साथ
एकटेपणाला मिळते
त्याच्या सोबतच्या क्षणांची
मजा वेगळीच असते
जीवन जगण्या पेक्षा
घडलेल्या चुकांची
त्या अनुभवांची चव चाखण्याची
मजा वेगळीच असते
- वरद
No comments:
Post a Comment