Friday, 12 August 2016

प्रवासी ...!!

आयुष्याच्या वाटेवर चालताना
भेटले होते अनेक प्रवासी
कुणी मांडलं होतं प्रेम
कुणाची तिरस्काराची रीत

अगणित नाती जोडली गेली
होती भावनांमधली प्रीत
तुटलेली नाती तेवढीच होती
दुखावलेल्या मनांचे गीत

रंग रूप भाषा स्वभाव
मेळ नसे सर्वांचा ठीक
समजले ज्यांना मन माझे
तेच राहिले जवळीक

हेच आपुलकीच नातं
लिहिल होत सागराच्या काठावर
डोळ्यांमध्ये आली होती भरती
जेव्हा वाहून गेलं होत सर्व

दिवसागणिक ही भरती
नुसत्या आठवणींनी वाढायची
डोक्यातील समुद्री वादळांनी
माझी होडी हेलकावे खायची


                   -   वरद

Wednesday, 3 August 2016

तुझ्याविना...!!

वाटलं होत तुला कधी
भेटणारच नाही
झाली होती चूक कधी
तुझ्याविना राहणारच नाही
केलं होत प्रेम कधी
तुझ्याविना होणारच नाही
बागडलो होतो कधी
तुझ्याविना हसणारच नाही
जगलो होतो कधी
तुझ्याविना मरणारच नाही
भरलं होत पोट कधी
तुझ्याविना अन्न नाही
मेलो होतो कधीच
तुझ्यासाठी भटकणार नाही

                -   वरद 

जादू या शब्दांची ...!!

जादू या शब्दांची
न उलगडणाऱ्या अर्थांची
होणाऱ्या प्रेमाची
वाटणाऱ्या तिरस्काराची
तुटणाऱ्या संसाराची
जोडणाऱ्या नात्यांची
क्षणिक सुखांची
नाजूक स्वरक्षणांची
आलेल्या अनुभवांची
सुंदर आठवणींची
लहान चुकांची
केलेल्या माफीची
ओळखलेल्या मनांची
बागडणाऱ्या फुलपाखराची
कोसळणाऱ्या धारांची
दाटलेल्या धुक्याची
जादू ही कवितेची
रहस्यमय शब्दांची
उलगडणाऱ्या भावनांची

                       -  वरद 

Tuesday, 2 August 2016

याद करता हु...!!

तेरी वो खिलखिलाती हँसी
अपने होंटो पे ले चलता हु
तेरी यादोंमे मैं तो
रोज नहाया करता हु

तेरी आँखों की नमी
अपने दिल में रखा करता हु
तेरी ख्वाबोमे अक्सर
मैं झुक जाया करता हु

तेरी हसीन यादोंको
मन में सजाया करता हु
जब भी तेरी याद आये
बस खुदा को याद करता हु

इतनी तेरी यादे
साथ लेकर जी लेता हु
अकेले ही कही
 टूट जाया करता हु

                       -   वरद


Monday, 1 August 2016

ती आणि कविता ...!!

तिला माझ्या कविता आवडतात
आणि मला कवितेतील ती
मी तिच्यात कविता शोधतो
ती कवितेत स्वतःला शोधते
तिला कवितेचा भाव समजतो
मला तिचा स्वभाव उमजतो
कळत नकळत शब्द जुळतात
धुंद मनांचे स्वर जुळतात
शब्दात ती गुंतून जाते
कवी मन माझे मोहरून जाते
तिच्या वाचण्याने कवितेच्या
स्वर मिळे शब्दांना
अर्थ मिळे कवितेस  तेव्हा
हसू येई गाली तिच्या जेव्हा


                          -   वरद