आयुष्याच्या वाटेवर चालताना
भेटले होते अनेक प्रवासी
कुणी मांडलं होतं प्रेम
कुणाची तिरस्काराची रीत
अगणित नाती जोडली गेली
होती भावनांमधली प्रीत
तुटलेली नाती तेवढीच होती
दुखावलेल्या मनांचे गीत
रंग रूप भाषा स्वभाव
मेळ नसे सर्वांचा ठीक
समजले ज्यांना मन माझे
तेच राहिले जवळीक
हेच आपुलकीच नातं
लिहिल होत सागराच्या काठावर
डोळ्यांमध्ये आली होती भरती
जेव्हा वाहून गेलं होत सर्व
दिवसागणिक ही भरती
नुसत्या आठवणींनी वाढायची
डोक्यातील समुद्री वादळांनी
माझी होडी हेलकावे खायची
- वरद
भेटले होते अनेक प्रवासी
कुणी मांडलं होतं प्रेम
कुणाची तिरस्काराची रीत
अगणित नाती जोडली गेली
होती भावनांमधली प्रीत
तुटलेली नाती तेवढीच होती
दुखावलेल्या मनांचे गीत
रंग रूप भाषा स्वभाव
मेळ नसे सर्वांचा ठीक
समजले ज्यांना मन माझे
तेच राहिले जवळीक
हेच आपुलकीच नातं
लिहिल होत सागराच्या काठावर
डोळ्यांमध्ये आली होती भरती
जेव्हा वाहून गेलं होत सर्व
दिवसागणिक ही भरती
नुसत्या आठवणींनी वाढायची
डोक्यातील समुद्री वादळांनी
माझी होडी हेलकावे खायची
- वरद
No comments:
Post a Comment