Wednesday, 21 September 2016

कविता आता सुचत नाही....!!

विचार डोक्यात इतके झाले
की कविताच सुचेना झाल्या
वयानुसार पावसाळे कमी पाहिले
तितक्या पावसाच्या धारा झेलल्या

वाटा अनेक फुटून गेल्या
काही त्या धारात वाहून गेल्या
अनुभव बनले मास्तर माझे
जगण्याच्या दिशा तयार झाल्या

घरट्यापासून दूर माझ्या
माणूस बनवून गेल्या
दुनिया गोल आहे रे असं
जाता जाता सांगून गेल्या

दिशांमध्ये झाला गोंधळ कारण
सूर्योदय आता होत नाही
विचारात गुरफटते मन इतके
की कविता आता सुचत नाही


                          - वरद 

Saturday, 17 September 2016

स्वप्नातील ढग....!

कधी कधी स्वप्नातल्या
ह्या सुप्त ढगातुनी
क्षणिक सुखाच्या जीवनाची
दिसते झलक ताऱ्यांची

दिवसागणिक बदलत
जाणाऱ्या नात्यांची
समाजात होणाऱ्या
अक्षम्य गैरवतनांची

बदल आहे माणसाच्या
जीवनातील एक रत्न
त्यातील परिणामांच्या
पर्वेतून सर्वच मुक्त

असे जगणेच दुर्दैवी
पण मरणे मात्र पाप
पण मी विसरलोच
हे तर स्वप्नातील ढग

फक्त स्वप्नातच भेटणारे ....! 


                       -  वरद