Monday, 18 July 2016

तुला पाहता...!!!

तुला पाहता माझ्या
मनी होत असे काही
तुझ्या नयनांची अथांगता
त्या सागरास नाही

तुझ्या कांतीची लकाकता
त्या भास्करास नाही
हरिणीसारख्या त्या जिवणीची
मूर्तिमंत प्रतिमा पाही

काळ्या मखमली केसांची
मुलायमता त्या कापसास नाही
सुंदर करकमलातील बळ
चिखलातील कमळातही नाही

बाह्य सौन्दर्याने मोहून
परखणारा मी नाही
तुझ्या शुद्ध मनीचा सुगंध
मी माझ्या मनी पाही

तुला पाहता माझ्या
मनी होत असे काही
तुला पाहता माझ्या
मनी होत असे काही

                  -  वरद 

Tuesday, 12 July 2016

किती सांगायचंय मला....!!!

किती सांगायचंय मला
खुप बोलायचय मला
 तुझ्या पंखांखाली
स्वछंदी विहरायचंय मला

किती सांगायचंय मला
डोळ्यांत तुझ्या बघायचंय मला
तुझ्या हृदयी वीणेची
तार छेडायचीय  मला

 किती सांगायचंय मला
हातात हात तुझा घ्यायचाय मला
तुझ्या त्या स्पर्शाने
डोळ्यात पाणी काढायचंय मला

किती सांगायचंय मला
तुझ्या मनात डोकवायचंय मला
तुझ्या सोबतच्या क्षणांची
उजळणी करायचीय मला

किती सांगायचंय मला
किती सांगायचंय मला
सर्व काही बाजूला ठेवून
फक्त तुझं व्हायचंय मला

किती सांगायचंय मला
खूप सांगायचंय मला

                              -   वरद