Thursday, 7 December 2017

क्या जिंदा हो तुम ??

कितनी भी निराशा हो
आपको हारना नही है
निराशा को आशा में बदल पाएं
तो जिंदा ही तुम

दुख दर्द देता हैं कहके
आपको रोना नाही हैं
आसुओंको हसी में बदल पाएं
तो जिंदा हो तुम

अंधेरेसे डर लगता हैं कहके
आपको पिछे हटना नही हैं
अंधेरे को उजाले मैं बदल पाए
तो जिंदा हो तुम

कौन जाने कल आएगा
यही स्वर्ग है कहके
आज़ खुल के जी पाए
तो जिंदा हो तुम

                      -  वरद

Wednesday, 15 November 2017

आज पुन्हा खूप बोलावेसे वाटते

आज पुन्हा खूप बोलावेसे वाटते
मनातले सगळे सांगावेसे वाटते
येणाऱ्या सुखात बागडावेसे वाटते
तर कधी दुःखाच्या चाहुलीने
मन हिरमुसले होते

आज पुन्हा खूप बोलावेसे वाटते
मनातले सगळे सांगावेसे वाटते
थांबवते मन माझे नकळत मला
नको वाहू या भावनांच्या लाटेवरून
पोहता जरी येत असेल तुला
पण अंतच नाही या सागराला

हरवलेल्या क्षणांच्या शोधात जातो
जणू वाळवंटात पाणी शोधतो
मृगजळच ते शेवटी
मी पुन्हा भानावर येतो आणि
स्वतःची समजूत घालू लागतो
स्वतःची समजूत घालू लागतो
   
                              - वरद

Monday, 11 September 2017

ये सफ़र...!!!

कही दिशाओं से निकल रहे थे ये रास्ते
कही दिशाओं तक साथ जाना था
निकल गई थी सब मंझीले बहोत दुर तक
हमे तो बस उनके पास जाना था

मिले थे बहोतसे लोग ये सफ़र में
सफ़र साथ करने का वादा रहा था
रेगिस्तान में दिखें घने बादलों जैसा
ये वादा एक बावंडर रहा था

सबको निकलना था अपने अपने रास्ते
किस्मत ने भी साथ छोड रखा था
कभी पिछे मुडकर देखने ना आए
उन्ही रास्तों पर हमको दफना दिया था

खत्म हो गया था सफर वही
आंखें अब खुल नहीं पाती
अंधे हो गए हैं हम
मंझीले अब नजर नही आती

                        -  वरद 

Wednesday, 10 May 2017

शबनम...!!!

शब्दों ने सजाईथी  ये ग़ज़ल
उसके अब सिर्फ शेर रह गए

जाते जाते कुछ न बोली वो
कभी न बिछड़ने के वादे
अब सिर्फ यादो में रह गए

रोज छोड़ आता था दो बून्द आसु
उसके आँगन में लगे पारिजात पे
हर सुबह उठ कर देखती थी वो
उस पारिजात का वो बहार

सुबह की  वो ओस की बुँदे
लाते थे बहार उन  फ़ूलोंमे
मिलती थी ठंडक उस मन को
जिसको हम चाहते है  

एक बार सिर्फ एक बार कभी
बाहर आकर उन फ़ूलोंको
वो नज़दीक से देखती तब
तब पता चलता उसको
वो आसुओ की बुँदे थी

हमेशा खुश रखना चाहता था उसको
आज तक कभी आंच ना आने दी
जाते जाते इतनाही सही
मेरे आसुओ ने उसको ख़ुशी दी
मेरे आसुओ ने उसको ख़ुशी दी

                                -  वरद




  

Tuesday, 11 April 2017

शोध हरवलेल्याचा...!!!

आज आठवणीत जरा 
जास्तच रमलो होतो 
काहीतरी शोधताना मी 
स्वतःच हरवलो होतो 

हरवलंय माझ सर्वस्व 
जाणीव त्याची करत होतो 
हरवलेल्या हसण्याचा शोध 
अश्रूंनी  करत होतो 

हरवलीय कविता माझी 
शब्द जुळवत होतो 
हरवलेल्या निद्रेच्या शोधात 
रात्र जागवत होतो 

हरवलेल्या विचारात गुंतून 
चांदणं मोजत होतो 
हरवलेल्या भावनांसाठी 
वाटेवरचे काटे शोधत होतो 

हरवलेल शोधता शोधता 
मी माझ मी पण हरवल होतं 

                      -  वरद 


Friday, 24 March 2017

माझी माऊ...!!!

आज दोन वर्ष झाली 
त्या माऊच्या जन्माला 
हो ते नामकरण पण 
मीच केलंय ' माऊ '

विचार केला होता 
ती लहान असताना  
तुम्हाला द्यायची  
म्हणून जन्मली तेव्हाच
ठेऊन घेतल मी 
तिला माझ्याजवळ 

तीच नाव पण ठेवलं 
अगदी हळू आवाजात 'माऊ'
म्हटलं तरी जवळ यायची
रोज माझ्या वाट्याचं दूध 
तिला घालायचो 

आता मोठी झाली ती 
पण गोष्टी पूर्वी सारख्या
 राहिल्या नाहीत 
माऊ माझ्याजवळच राहिली 
तुम्हाला द्यायची राहून गेली

रोज येते ती जवळ 
आठवण काढून द्यायला 
छातीशी घट्ट कवटाळून तिला 
होतो निद्रेच्या आधीन 

माऊ माझ्याजवळच आहे 
माझ्या आठवणीं बरोबर 
 
                           - वरद 
 

 



Thursday, 16 March 2017

दुःखातली ताकद...!!!

अन्ना सवे दुःख काय ?
ते गिळून टाकता येत
रडून रडून अश्रूंसवे ते
दुसऱ्यापुढे मांडता येत

सांत्वनासाठी कोणी येत तर
कोणी कुरवाळून धीर देत
इवल्याशा काडीच्या आधारावर
जगण्याची उमेद मिळवून देत

हेच ते दुःख ,
एकवेळ नकोस झालेलं जीवन
कधी कधी पुन्हा उभारी देत
नवीन उमेदीनं झेप घेण्यासाठी

आणि महत्वाचं म्हणजे
माणसं ओळखायला शिकवतं
टिकलोच ह्या जीवनात तर
पंखांमध्ये बळ येत
आणि नाही टिकलो तर .....
स्वतःच अनंताचे दार उघडून देत

                        -  वरद 

Thursday, 23 February 2017

कविता लिहीत गेलो...!!!

आज बऱ्याच दिवसांनी लिहायला गेलो

सुचत नव्हते काही पण शब्द जुळवत गेलो

धकाधकीच्या जीवनात या मी पळवाटा शोधत गेलो

बोथट झाली लेखणी म्हणून तिला धार काढत गेलो

अक्षरांच्या दिमतीने मी कविता लिहीत गेलो

शब्द रुपी मनातील भाव कागदावर मांडत गेलो

लिहिता लिहिता आयुष्याचे गणित सोडवत गेलो

कुठे हरवले ते क्षण याचा विचार करीत गेलो

आणि स्वतःसाठी लेखणीची शाई संपवत गेलो

निवांत या क्षणी मी कविता लिहीत गेलो

                                             - वरद