Saturday, 16 April 2016

जगण्यातील अर्थ

इथे जन्म घेतात माणसे
होतात काहींची रत्ने
न होती अमर सारे
मग जगण्याला अर्थ का रे

अर्थाचा कधी अनर्थ होतो
गैरसमजातून स्वार्थ घडतो
उपकाराचा भाव जडतो
मग जगण्याला अर्थ का रे

मरणाला सर्व घाबरतात
वाईट जगणे मरण म्हणतात
भीतीपोटी हा मार्ग पत्करतात
मग जगण्याला अर्थ का रे

जगणे नाही माणूस बदलतो
माणूस  असून माणसाला विसरतो
पण तरीही जगतच असतो
मग जगण्याला अर्थ का रे

कोणत्याही जगण्याला अर्थ नसतो
तो अर्थ आणावा लागतो
तेच जगण सार्थ  असत  ......
नात्यामधील अस्तित्वाने
फरक पडत नहीं ज्याला
त्याच जगण  मात्र निरर्थक असत.......... 

                                             -    वरद

No comments:

Post a Comment