स्वप्न हे सजताना
रात्र ही सरते....
गोड अशा झोपेत
साखर ही तरळते....
मनातील भाव
उमटतात स्वप्नात....
पाहतो आपण तेच
विचारांच्या गुंत्यात....
मिटलेल्या डोळ्यांनी
चित्र तुझे सजते....
तिथे जाण्यास मग
मन वेडे झुलते.....
स्वप्नांना येतो
गोडपणा साखरेचा....
दरवळतो सुगंध
त्या रातराणीचा....
ऊनातही होते
थंडीची बरसात.....
भिजते मनही वेडे
त्या थंड तुषारांत....
वाटते भिती ज्यांची
चार हात त्यांच्याशी....
नसे होत हिम्मत तर
झोपेतही तू रडशी.....
स्वप्नात सगळ
चालून जातं....
कळत नकळत सगळ
घडून जातं....
स्वप्नात जमते या
शब्दांची मैफील....
धुंद या आठवणीत
जगापासून गाफील.....
स्वप्नातल्या या सावल्यांचा
होतो खेळ जास्त थोडा....
पण.....
तिथेही नाही मिळाली साखर
होतो निराश हा वेडा....!!!
- वरद
No comments:
Post a Comment