मैत्री म्हणजे असतो आधार...
एकमेकांचा अतुट विश्वास...
मैत्री म्हणजे कौतुकाची थाप...
हसता खेळता सहवास...
मैत्री म्हणजे सुर्योदय...
जीवनातील आस...
मैत्री म्हणजे सुरेख गंध...
दरवळणारा स्वच्छ सुवास...
मैत्री म्हणजे भांडण...
दुराव्याचा आभास...
मैत्री म्हणजे आपलेपण...
गप्पांचा तास...
मैत्री म्हणजे प्रोत्साहन...
पुढे जाण्याची कास...
मैत्री म्हणजे जीवन...
नात्यातला श्वास...
मैत्री म्हणजे मैत्री...
तुमची नि आमची खास.......!!!
- वरद
No comments:
Post a Comment