Thursday, 14 April 2016

तुच मित्रा

कविता कशी होते
मनाला कळत नाही
मैत्री कशी होते
कोणालाच माहीत नाही

केव्हातरी कुठेतरी
मन होतं हळूवार
मित्राकडे उघडतं मग
आपल्या भावनांचं दार

आपलं नातं असच आहे
भावनांच्या पलिकडे फार
एकमेकाचे विचार आपण
वाटून घेतोना यार

अशीच आपली मैत्री
जिवापाड जपावी
तुझ्या माझ्या यारीने
ती फूलतच रहावी
      
               -वरद

No comments:

Post a Comment